शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:44 AM

भरूच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला ‘हिलसा’ या चवदार माशाचा तडका लाभला आहे. नर्मदा नदी जेथे समुद्राला मिळते, तेथे खाडीपात्रात

भरूच : भरूच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला ‘हिलसा’ या चवदार माशाचा तडका लाभला आहे. नर्मदा नदी जेथे समुद्राला मिळते, तेथे खाडीपात्रात पावसाळ््यात हिलसा माशाची पैदास होते. मच्छीमारांची २५ हजार कुटुंबे या मासेमारीवर वर्षभर पोट भरतात. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारबुतजवळ समुद्रात रस्ता बांधण्याचे भूमिपूजन करण्यात आले. परिणामी, समुद्राचे खारे पाणी व नर्मदेचे गोडे पाणी यांच्या संगमामुळे होणारी हिलसाची पैदास बंद होऊन बेरोजगारीचे स्ोंकट ओढवणार या भीतीने हे मच्छीमार भयभीत आहेत.भरूच शहरात पोहोचल्यावर बारबुतमधील या नाराजीची कुणकुण लागली. लागलीच २० कि.मी. अंतरावरील हे गाव गाठले. गावचे सरपंच प्रवीणभाई तांडेल, संतोषभाई, अश्विनभाई आणि बारबुत मत्सोद्योग सहकारी मंडळाचे अध्यक्ष रमेशभाई जमा झाले. समोर विस्तीर्ण खाडीपात्र दूरदूरवर पसरले होते. येथून सहा कि.मी. अंतरावर समुद्रात रस्ता बांधण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. यामुळे नर्मदेचे गोडे पाणी आणि समुद्राचे खारे पाणी यांचा संगम होण्याची प्रक्रिया जवळपास बंद होऊन भरूच विधानसभा मतदारसंघातील किनाºयावरील दहेज ते जनोर आणि अंकलेश्वर विधानसभा मतदारसंघातील भालोद ते कट्याजाल या किनाºयालगतच्या मच्छीमारांवर उपासमारीची पाळी येणार आहे. हिलसा माशाला पश्चिम बंगाल, बांगलादेश येथून मोठी मागणी आहे. १५०० रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा हा मासा, दरमहा येथील २५ हजार मच्छीमार कुटुंबाना १० ते १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देतो. माशाची पैदास बंद झाली, तर आमच्या पाच-पाच लाखांच्या बोटी बंद होतील. नर्मदा नदीचे पात्र बदलल्याने याच परिसरातील सुकलातीर्थ व कबीरवडा या पर्यटनस्थळांनाही फटका बसला आहे. तेथील अनेक जण बेरोजगार झाले आहेत. सरदार सरोवर प्रकल्पातून दररोज ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करणे बंधनकारक असताना, पाणी सोडण्यात येत नसल्याची तक्रारही मच्छीमार व परिसरातील नागरिकांनी केली. राज्यातील भाजपा सरकार केवळ उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेते, अशी त्यांची कैफियत आहे. मच्छीमारांनी ‘काम बंद’ आंदोलन केले, निदर्शने केली. मच्छीमारांची नाराजी ही निवडणुकीत डोकेदुखी ठरणार, असे वाटल्यावर भाजपाचे सहकारमंत्री, स्थानिक खासदार, आमदार यांनी बारबुतला धाव घेऊन बाबापुता सुरू केले. मतदानावर बहिष्कार न घालण्याची विनंती केली. निवडणुकीनंतर समुद्रातील रस्त्याचे काम न थांबल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला.वाघरा, जंबुसरमध्ये कडवे आव्हानजंबुसर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार छत्रसिंग मोरी यांना कडवा विरोध आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजयसिंग सोलंकी लढत आहेत. या मतदारसंघातून वरताल स्वामिनारायण संप्रदायाचे देवकिशोर स्वामी यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. ती नाकारण्यात आली. काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी आ. किरण मकवाना यांनाही उमेदवारी दिली नाही. त्याचबरोबर नाराज भाजपा नेते खुमानसी मासिया यांनी रिंगणात उडी घेतली आहे. ही नाराजी हेरुन नरेंद्र मोदी येथे जाहीर सभा घेणार आहेत.‘झगडिया’त दोन छोटू वसावाआदिवासीबहुल झगडिया विधानसभा मतदारसंघातून छोटू वसावा हे विजयी होतात. आतापर्यंत भाजपाचे बोट पकडणाºया वसावा यांनी या वेळी काँग्रेसचा हात धरला आहे. मात्र यामुळे काँग्रेसमधील बिगर आदिवासी नेते नाराज आहेत. वसावा व त्यांच्या समर्थकांची या परिसरात दहशत आहे. बाण नितीशकुमार यांच्याकडे गेल्याने या वेळी वसावा यांना चिन्ह बदलावे लागले. जेडीयूने भाजपाच्या सांगण्यावरून छोटू वसावा नावाच्याच एका व्यक्तीला बाण चिन्ह देऊन रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे मतदारांत नवी निशाणी पोहोचवताना वसावा यांची दमछाक होतेय.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017