पाकच्या गोळीबारात मासेमार जखमी

By Admin | Updated: October 15, 2015 23:27 IST2015-10-15T23:27:25+5:302015-10-15T23:27:25+5:30

पाकिस्तानी समुद्री सुरक्षा दलाने (एमएसए) गुजरातच्या जखाऊ किनाऱ्याजवळ गुरुवारी दुपारी केलेल्या गोळीबारात एक भारतीय मासेमार जखमी झाला.

Fisherman injured in Pak firing | पाकच्या गोळीबारात मासेमार जखमी

पाकच्या गोळीबारात मासेमार जखमी

अहमदाबाद : पाकिस्तानी समुद्री सुरक्षा दलाने (एमएसए) गुजरातच्या जखाऊ किनाऱ्याजवळ गुरुवारी दुपारी केलेल्या गोळीबारात एक भारतीय मासेमार जखमी झाला. पाकिस्तानच्या संस्थेने गुजरात किनारपट्टीलगतच्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेजवळ २४ मासेमारांना ओलिस ठेवून त्यांच्या चार बोटी ताब्यात घेतल्या आहेत.
राष्ट्रीय मासेमार संघाचे सचिव मनीष लोधारी यांनी या घटनेची माहिती दिली.
पाकचे सैनिक बोटीतून आले आणि आंतरराष्ट्रीय समुद्री सीमारेषेजवळ मासेमारी करीत असलेल्या भारतीय बोटींवर अंदाधुंद गोळीबार केला. यात एक मासेमार जखमी झाला. त्यानंतर त्यांनी जखमी मासेमारासह २४ मासेमार आणि त्यांच्या चार बोटी ताब्यात घेतल्या व कराची बंदराकडे गेले.(वृत्तसंस्था)

Web Title: Fisherman injured in Pak firing