दिल्लीत डेंग्यूचा पहिला बळी
By Admin | Updated: July 27, 2016 02:07 IST2016-07-27T02:07:13+5:302016-07-27T02:07:13+5:30
देशाच्या राजधानीत डेंग्यूने १७ वर्षीय मुलीच्या रूपाने यावर्षीचा पहिला बळी घेतला. दिल्लीच्या जाफराबाद भागातील रहिवासी असलेल्या या मुलीचा उपचार सुरू असताना लोकनायक

दिल्लीत डेंग्यूचा पहिला बळी
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत डेंग्यूने १७ वर्षीय मुलीच्या रूपाने यावर्षीचा पहिला बळी घेतला. दिल्लीच्या जाफराबाद भागातील रहिवासी असलेल्या या मुलीचा उपचार सुरू असताना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण डेंग्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तापेसह उलट्या होत असल्यामुळे या मुलीला आधी सरकारी जगप्रवेश चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रकृती खालावल्यामुळे २० जुलै रोजी तिला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.