शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळयात प्रथमच चीनने डोकलाममध्ये सैन्य तैनात केले, 1600 ते 1800 चिनी सैनिकांनी ठोकला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 10:31 IST

डोकलाममध्ये कायमस्वरुपी तळ उभारण्याचे चीनने जवळपास निश्चित केले आहे. डोकलाममध्ये सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या भागात चीनचे 1600 ते 1800 सैनिक तैनात आहेत.

ठळक मुद्देडोकलामच्या दक्षिणेला जामफेरीपर्यंत रस्ता विस्तार करण्यापासून चीनला रोखण्याचे भारताचे रणनितीक उद्दिष्टय होते. याआधी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त डोकलाम प्रदेशावर आपला हक्क सांगण्यासाठी  एप्रिल-मे आणि ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात चिनी सैन्य इथे गस्त घालायचे.

नवी दिल्ली - डोकलाममध्ये कायमस्वरुपी तळ उभारण्याचे चीनने जवळपास निश्चित केले आहे. डोकलाममध्ये सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या भागात चीनचे 1600 ते 1800 सैनिक तैनात आहेत. चीनकडून इथे कायमस्वरुपी तळ उभारण्याची तयारी सुरु आहे. कडाक्याच्या थंडीत सैन्याला टिकून राहाता यावे यासाठी चीनकडून इथे दोन हॅलिपॅड, रस्ते, तंबू आणि स्टोअर्स रुम बांधण्याचे काम सुरु आहे. 

डोकलामच्या दक्षिणेला जामफेरीपर्यंत रस्ता विस्तार करण्यापासून चीनला रोखण्याचे भारताचे रणनितीक उद्दिष्टय होते. त्यात आपण यशस्वी ठरलो असे भारतीय संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले. याआधी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त डोकलाम प्रदेशावर आपला हक्क सांगण्यासाठी  एप्रिल-मे आणि ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात चिनी सैन्य इथे गस्त घालायचे. आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी चिनी सैन्य या भागात यायचे असे सूत्रांनी सांगितले. 

यावर्षी 73 दिवस डोकलामध्ये भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते. दोन्ही देशातील राजनैतिक अधिका-यांनी कुटनितीक तोडगा काढल्यानंतर 28 ऑगस्टला दोन्ही देशांचे सैन्य मागे फिरले. यंदाच्या हिवाळयात प्रथमच चिनी सैन्याने डोकलाममध्ये तळ ठोकला आहे. भारत आणि चीनचे सैन्य ज्या भागात समोरासमोर आले होते तिथे कुठलीही संघर्षाची स्थिती नाही. चीनला डोकलाममध्ये रस्ता बांधणीचे काम करु दिले असते तर भारताचा महत्वाचा भूभाग थेट चीनच्या टप्प्यामध्ये येणार होता. त्यामुळे भारताने तीव्र आक्षेप घेत रस्ता बांधणीचे काम रोखून धरले. वादग्रस्त भागात चीन वारंवार कुरघोडीचा प्रयत्न करेल असे भाकीत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सप्टेंबर महिन्यात केले होते. ते खरे ठरताना दिसतयं. रणनितीक वर्चस्व मिळवण्यासाठी डोकलामचा भाग बळकावण्याचा चीनचा इरादा आहे. ट्रायजंक्शन परिसरात भारतीय सैन्यही मोक्याच्या ठिकाणांवर तैनात आहे. 

डोकलामपासून जवळच चीनने बांधली 400 मीटर उंचीची भिंतडोकलाममधल्या वादग्रस्त भागातून माघार घेऊन चिनी सैन्य 400 मीटर आत गेले असले तरी चीन अजिबात गप्प बसलेला नाही. डोकलामपासून जवळच जिथे चिनी सैनिकांनी तळ ठोकलाय तिथे मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे.  झी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारली आहे. आपण काय करतोय याची कुणालाही खबर लागू नये यासाठी चीनने ही भिंत बांधली आहे.

चीनकडून या भागात मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे तसेच मोठया संख्येने चिनी सैनिक इथे तैनात करण्यात आले आहेत. सैनिकांना सामावून घेण्यासाठी 16 बराक बांधण्यात आले आहेत. सहा बोगदे बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या 23 ते 27 शेडस असून 200 पेक्षा जास्त तंबू ठोकण्यात आले आहेत. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन