शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...तर ईशान्य भारतात फक्त एका राज्यात राहिल काँग्रेसचे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:40 IST

उत्तरेपाठोपाठ ईशान्य भारतातही भाजपाचा मोठा विस्तार होण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. या दोन्ही राज्यात अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देत्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यात भाजपा आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. तीनपैकी दोन एक्झिट पोल्सनी त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये काल  विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. उत्तरेपाठोपाठ ईशान्य भारतातही भाजपाचा मोठा विस्तार होण्याचे संकेत या एक्झिट पोलने दिले आहेत. त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यात भाजपा आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये भाजपाला संधी नसली तरी तिथे काँग्रेसचे सरकार येणार नाही, ही भाजपासाठी जमेची बाजू आहे. 

मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती राहू शकते. माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमा यांनी स्थापन केलेला एनपीपी सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. त्रिपुरा, नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभेत सध्या भाजपाची ताकत नगण्य आहे. या दोन्ही राज्यात अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये भाजपा डाव्यांचे संस्थान खालसा करण्याची शक्यता आहे. मागच्या 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता आहे.  

तीनपैकी दोन एक्झिट पोल्सनी त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तिसऱ्या एक्झिट पोलने अटीतटीचा सामना होईल असे म्हटले आहे.  नागालँडमध्ये भाजपा माजी मुख्यमंत्री  नेफ्यू रियो यांच्या एनडीपीपी पक्षाबरोबर आघाडी करुन निवडणूक लढवत आहे.

नागालँडमध्ये काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व दाखवता आलेले नाही. सध्या इथे एनपीएफचे सरकार आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार निकाल लागले तर पहिल्यांदाच संपूर्ण ईशान्य भारतात फक्त मिझोराम या एका राज्यात काँग्रेसचे सरकार राहिल.                                                     

टॅग्स :congressकाँग्रेसnorth eastईशान्य भारत