शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सामान्य माणसाला प्रथमच बहाल होणार संतपद; देवसहायम पिल्लई यांच्या कार्याचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 08:25 IST

व्हॅटिकनचा निर्णय

तिरुवनंतपुरम : भारतामध्ये ख्रिश्चन समुदायाच्या इतिहासात प्रथमच एका सामान्य माणसाला व्हॅटिकन चर्चकडून संतपद बहाल केले जाणार आहे. देवसहायम पिल्लई असे त्यांचे नाव असून तामिळनाडूत १८ व्या शतकात त्यांचा जन्म झाला. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ते लाझारस या नावाने ओळखले जाऊ लागले. 

पोप फ्रान्सिस हे अन्य सहा जणांसह देवसहायम पिल्लई यांनाही पुढील वर्षी १५ मे रोजी व्हॅटिकन येथील सेंट पीटर्स बॅसिलियामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात संतपद बहाल करणार आहेत. ही घोषणा व्हॅटिकन चर्चने मंगळवारी केली. देवसहायम यांनी १७४५ मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. देवसहायम किंवा लाझारस याचा अर्थ देवच माझा पाठीराखा आहे. 

जातीपातीचे भेद दूर करा, सर्व लोक समान आहेत अशी शिकवण देवसहायम आपल्या प्रवचनांतून सर्वांना देत असत. त्यांच्या शिकवणीमुळे उच्चवर्णीयांतील अनेक लोक त्यांचा द्वेष करू लागले. परिणामी देवसहायम यांना १७४९ मध्ये अटक करण्यात आली. १४ जानेवारी १७५२ मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांनी धर्मासाठी हौतात्म्य पत्करले होते.  देवसहायम पिल्लई यांच्या ३०० व्या जयंती नंतर २ डिसेंबर २०१२ रोजी कोट्टार येथे एक विशेष समारंभ आयोजिण्यात आला होता. त्यात त्यांना ब्लेसड (प्रभूची कृपा) असलेले म्हणून जाहीर करण्यात आले. (वृत्तसंस्था)

कोट्टार येथे जपून ठेवल्या स्मृती

देवसहायम पिल्लई यांचा जन्म कन्याकुमारी जिल्ह्यातील नत्तालम येथे हिंदू नायर कुटुंबात २३ एप्रिल १७१२ रोजी झाला होता. त्यावेळी हा भाग तत्कालीन त्रावणकोर संस्थानात होता. तामिळनाडूत कोट्टार येथे त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या तसेच याच परिसरात त्यांनी हौतात्म्य पत्करले. 

टॅग्स :Indiaभारत