शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनं पहिल्यांदाच घेतला मुख्यमंत्री आदित्यनाथांवर “फिडबॅक”; महासचिवांनी एकट्यात घेतली मंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 11:51 IST

सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सातत्याने प्रश्न उभे राहत आहे. अशातच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष यांनी राज्याचा दौरा केला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे.पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बीएल संतोष यांनी सोमवारी लखनौ येथे मंत्री आणि पक्षाच्या नेत्याची प्रत्यक्ष बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठका म्हणजे भाजपकडून नेत्यांना आपले विचार ठेवण्यासाठी दिलेले एक खुले व्यासपीठ  आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये योगी आदित्यनाथ सत्येत आल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने “फिडबॅक” घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बीएल संतोष यांनी सोमवारी लखनौ येथे मंत्री आणि पक्षाच्या नेत्याची प्रत्यक्ष बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही त्यांच्या निवासस्थानी बौठक केली. 

सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सातत्याने प्रश्न उभे राहत आहे. अशातच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष यांनी राज्याचा दौरा केला आहे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनी नेतृत्वासंदर्भात सार्वजनिकपणे वक्तव्यही केले होते. याशिवाय नुकत्याच झालेल्या पंचायतींच्या निवडणुकीतही पक्षाचे प्रदर्शन खराब राहिले. येथे पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायतींच्या निवडणुकीला महत्व आहे. एवढेच नाही, तर राज्यात मंत्रीमंडळामध्ये फेरबदल केला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांनी नेत्यांसोबत विविध विभागांचे कामकाज, कोरोना काळातील कार्य, समस्या आणि पक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वापरले जाणारे धोरण, यांवर त्यांचे मत मागवले. तसेच त्यांना, भाजप आणि सरकारमधील समन्वयाच्या आभावाबरोबरच पक्षाचे नेते आणि पक्षातील नेत्यांची कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यासंदर्भात असमर्थता यासंदर्भातही माहिती मिळाली होती, असेही समजते.

CoronaVirus: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा '3T' फॉर्म्यूला हिट; उत्तर प्रदेशात असा सुरू आहे कोरोनाचा सामना

संतोष यांनी आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह, वैद्यकीय शिक्षण आणि अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि कायदामंत्री बृजेश पाठक यांच्यासह जवळपास सात मंत्र्यांशी चर्चा केली. बृजेश पाठक हे कोरोना व्यवस्थापनासंदर्भात चिंता व्यक्त करणारे पहिले व्यक्ती होते.

या बैठकीला भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी राधा मोहन सिंह, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटन प्रदेश प्रभारी महासचिव सुनील बंसलदेखील उपस्थित होते. संतोष हे मंगळवारी उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासह सरकारमधील इतर मंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठका म्हणजे भाजपकडून नेत्यांना आपले विचार ठेवण्यासाठी दिलेले एक खुले व्यासपीठ  आहे. त्यांना शांत करण्याचा एक प्रयत्न आहे. एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, ‘पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक बैठका होत होत्या, मात्र, यावेळी संघटनेचे नेते थेट फिडबॅक घेत आहेत आणि संघटना आणि सरकारमध्ये समन्वयाचे काही मुद्दे होते, जे नेत्यांकडून सातत्याने उचलले जात आहेत. यांवर बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक