शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानांमध्ये जवानांना प्रथम प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 21:19 IST

एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. 

नवी दिल्ली, दि. 16 - एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. एअर इंडियाने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही दलातील जवानांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.  15 ऑगस्टपासून देशातील सर्व विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जगातील काही देशांमध्ये विमानात प्रवेश करताना जवानांना पहिल्यांदा सोडले जाते. त्याच धर्तीवर एअर इंडियाने हा निर्णय अवलंबला असल्याचे समजते. दरम्यान, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग उबेरॉय यांनी ई-मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. 

याचबरोबर, देशासाठी लढणा-या जवानांच्या योगदानाचा आमच्याकडून उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रथम जवानांना आणि बिझनेस श्रेणीच्या प्रवाशांच्या आधी चढू दिले जाणार आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले की, यासोबतच जवानांना देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. 

आणखी वाचा -(एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल)(एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य)(...तर टाटा ग्रुप एअर इंडिया कंपनी खरेदी करेल- रिपोर्ट)