lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य

एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य

एखाद्या विमान वाहतूक कंपनीलाच एअर इंडियाची विक्री करण्यास सरकारकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:15 AM2017-08-01T01:15:55+5:302017-08-01T01:15:57+5:30

एखाद्या विमान वाहतूक कंपनीलाच एअर इंडियाची विक्री करण्यास सरकारकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Air India preferred to sell Air India | एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य

एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य

नवी दिल्ली : एखाद्या विमान वाहतूक कंपनीलाच एअर इंडियाची विक्री करण्यास सरकारकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. एअर इंडियाचा कर्मचारी वर्ग सेवेत कायम राहिला पाहिजे, अशी सरकारची अपेक्षा असून, विमान वाहतूक कंपनीने अधिग्रहण केले तरच हे शक्य होईल, असेही या अधिकाºयाने सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, इंडिगोने एअर इंडियाचा आंतरराष्टÑीय व्यवसाय विकत घेण्यात रस दाखविला
आहे. त्याचवेळी काही खासगी गुंतवणूकदार संस्थाही एअर इंडियातील हिस्सेदारी खरेदी करण्यास उत्सुक आहेत. विस्तारा आणि एअर एशिया इंडिया या हवाई वाहतूक कंपन्यांत हिस्सेदारी असलेला टाटा उद्योग समूहही उत्सुक असल्याचे वृत्त आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की, खरेदीदार विमान वाहतूकदारच असावा, असे बंधन घालून संभाव्य खरेदीदारांना स्पर्धेबाहेर ठेवू नये.

Web Title: Air India preferred to sell Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.