शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:19 IST

1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती.

नवी दिल्ली - मोबाइल हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या घडीला भारतात मोबाईलचे कोट्यवधी युझर्स असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र 1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. 1995 साली भारतात मोबाइलचे आगमन झाले आणि आजच्याच दिवशी 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिल्यांदा मोबाइलची रिंग खणाणली होती. 31 जुलै 1995 रोजी तेव्हाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना मोबाइलवरून फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. ज्योती बसू यांनी हा फोन कोलकाता येथील रॉयटर्स बिल्डिंगमधून दिल्लीतील संचार भवनमध्ये केला होता.  भारतातील पहिली मोबाइल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा होती. याच कंपनीच्या सेवेला मोबाइल नेट या नावाने ओळखले जात असे. याच कंपनीच्या नेटवर्कवरून भारातातील पहिला मोबाइल कॉल करण्यात आला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांची संयुक्त कंपनी होती. ही कंपनी तेव्हाच्या देशातील आठ कंपन्यांपैकी एक होती ज्यांना भारताता सेल्युलर सर्व्हिस पुरवण्यासाठी परवाना मिळाला होता.  मात्र 1995 साली भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य भारतीयाच्या हातात मोबाईल फोन येण्यास बराच वेळ लागला. त्याचे कारण म्हणजे मोबाइल सेवेचे असलेले महागडे दर हे होते. त्याकाळी एका आऊटगोईंग कॉलसाठी 16 रुपये प्रति मिनीट एवढा दर होता. तर इनकमिंग कॉलवरही ठरावीक शुल्क आकारले जाई.  भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत मोबाइल युझर्सची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मात्र हा आकडा वेगाने वाढला. आज भारतातील 65 टक्क्यांहून अधिक लोकांकडे मोबाइल आहेत.  

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारतnewsबातम्या