शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था द्वारकेमध्ये, मोदी यांची घोषणा; देवदर्शनानंतर गुजरात दौ-याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 2:28 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील पहिल्या सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा द्वारका येथे केली. मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौºयावर आहेत. सकाळी त्यांनी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले.

द्वारका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील पहिल्या सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा द्वारका येथे केली. मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौºयावर आहेत. सकाळी त्यांनी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले.एका महिन्याच्या काळातील हा त्यांचा तिसरा गुजरात दौरा आहे. तिथे लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह पंतप्रधानांचेही गुजरात दौरे वाढले आहेत.द्वारकेमध्ये जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील ही पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था आहे. मोडकजवळ याची स्थापना करण्यात येणार आहे. समुद्रकिनाºयांच्या सुरक्षेसाठी आम्ही आम्ही सागरी पोलिसांच्या आधुनिकीकरणावर भर देत आहोत. ज्याप्रमाणे हवाई दलाच्या पायलटना जामनगर येथे प्रशिक्षित केले जाते, त्याप्रमाणे सागरी पोलिसांना येथे प्रशिक्षित करण्यात येईल.पंतप्रधानांनी द्वारका-ओखा यांना जोडणाºया पुलाचे भूमिपूजन केले. या पुलाचा अंदाजित खर्च ९६२ कोटी रुपये आहे. त्यावरील सोलर पॅनलद्वारे १ मेगावॅट वीज मिळणार आहे.पंतप्रधान मोदी यांनी ५,८२५ कोटी रुपये खर्चाच्या चार राज्यमार्ग योजनांचे भूमिपूजन केले. मोदी म्हणाले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या भागाचा विकास आपल्याला करावा लागेल. आज आपण ज्या पुलाचे भूमिपूजन केले आहे, तो पूल फक्त द्वारकेला नव्हे, तर इतिहास आणि संस्कृतीला जोडणारा ठरणार आहे. (वृत्तसंस्था)दिवाळी लवकर सुरूजीएसटीसंदर्भात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की, जीएसटीबाबतच्या नव्या निर्णयांमुळे नागरिकांची दिवाळी लवकरच सुरू झाली आहे. जीएसटीसंदर्भातील काही बाबींना गुजरातमधील कपडा व्यापाºयांनी जोरदार विरोध दर्शविला होता.विकासाची परिभाषा बदलली : मोदीचोटिला (राजकोट) : विकासाच्या मुद्द्यांवरून काँग्रेससह काही विरोधी पक्षांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, पूर्वी एखाद्या भागात हातपंप बसविण्याला विकास म्हणत होते. मात्र, आम्ही विकासाची परिभाषाच पूर्णपणे बदलून टाकली आहे.पूर्वी एखादा राजकीय नेताएकाच हातपंपाच्या जिवावर आपणास पुन्हा-पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करत असे. आम्ही नर्मदेचे पाणी पाइपलाइनने येथे आणले आहे. त्यामुळे या भागाचे नंदनवन होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी