काँग्रेसची 40 जणांची पहिली यादी 19 ला
By Admin | Updated: September 16, 2014 03:06 IST2014-09-16T03:06:04+5:302014-09-16T03:06:04+5:30
महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी अंतिम टप्प्यात आली आहे

काँग्रेसची 40 जणांची पहिली यादी 19 ला
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी अंतिम टप्प्यात आली आहे. 4क् जणांची ही यादी 19 सप्टेंबरला व उर्वरीत यादी 22 सप्टेंबरला जाहीर होईल, अशी माहिती पक्षाच्या विश्वसनीय सूत्रंनी दिली. सोमवारी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली, त्यात उमेदवारीवर चर्चा झाली.
छाननी समितीच्या बैठकीत भ्रष्टाचारी व गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या इच्छुकांना उमेदवारी द्यायची का, हा कळीचा मुद्दा चर्चिला गेला. त्यामुळे 35 इच्छुकांच्या नावांचा फेरविचार होण्याची शक्यता आहे, असे समजते.
छाननी समितीचे अध्यक्ष मल्लिकाजरुन खरगे यांच्या निवासस्थानी संध्याकाळी साडेसहाला बैठक सुरू झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रचार समिती प्रमुख नारायण राणो, समन्वय
समिती प्रमुख अशोक चव्हाण,
अखिल भारतीय काँग्रेसचे
सचिव दीपक बाबरिया बैठकीला उपस्थित होते. साडेतीन तासांच्या मंथनानंतर 174 पैकी 35 जागांवरील चर्चा अपूर्ण राहिली. त्यासाठी मंगळवारी सकाळी पुन्हा बैठक
होईल, असे सूत्रंचे म्हणणो
आहे.
144 जागांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दाही
चर्चेत आला. 144 जागांची राष्ट्रवादीची मागणी आणि काँग्रेसचे उमेदवार यांचा बैठकीत ताळमेळ बसला नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी परदेशात असल्याने त्या मायदेशी परतल्यानंतर शुक्रवारी सकाळी छाननी समितीने केलेली यादी त्यांना दाखविली जाईल, त्यानंतर यादीला अंतिम स्वरुप येईल, असे पक्षाच्या सूत्रंनी सांगितले.