बार्शीटाकळी येथील पहिल्या महसूल लोकअदालतीत १० प्रकरणांचा निपटारा

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30

बाार्शीटाकळी : महसूल विभागाच्या वतीने १४ मार्च रोजी येथील तहसील कार्यालयात आयोजित पहिल्या महसूल लोकअदालतीमध्ये जमीनजुमल्यांशी संबंधित तंट्यांच्या १० प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला.

First issue of Barshitakali settlement of 10 cases in public | बार्शीटाकळी येथील पहिल्या महसूल लोकअदालतीत १० प्रकरणांचा निपटारा

बार्शीटाकळी येथील पहिल्या महसूल लोकअदालतीत १० प्रकरणांचा निपटारा

ार्शीटाकळी : महसूल विभागाच्या वतीने १४ मार्च रोजी येथील तहसील कार्यालयात आयोजित पहिल्या महसूल लोकअदालतीमध्ये जमीनजुमल्यांशी संबंधित तंट्यांच्या १० प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने न्यायालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या लोकअदालतींच्या धर्तीवर जमीन-जुमले विषयक तंट्यांचा चर्चेतून तडजोडीद्वारे निपटारा करून तंटे मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतींचे आयोजन करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या लोकअदालतींपैकी बार्शीटाकळी तालुक्यातील पहिली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बार्शीटाकळी तहसील कार्यालयात करण्यात आले होते. तहसीलदार एस.एस.सानप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २० प्रकरणांशी संबंधित वादी, प्रतिवादींना बोलावण्यात आले होते. यातील १० प्रकरणांशी संबंधित लोकांनी या लोकअदालतीमध्ये उपस्थित राहून आपआपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडले. यावेळी तहसीलदार व अन्य सदस्यांनी संबंधितांच्या समस्यांवर चर्चा करून त्यांचे तंटे परस्पर संमतीने मिटवून न्याय दिला. या अदालतीमध्ये पाटखेड, राजनखेड, आळंदा यासह अन्य गावांमधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲड. अनिल भगत, नायब तहसीलदार योगेश देशमुख, संबंधित गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
००००००००००००००००००००००००००००००

Web Title: First issue of Barshitakali settlement of 10 cases in public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.