जिल्ातील पहिली चारा छावणी अहमदपुरात चार्याचा प्रश्न : नवीन वर्षात दोन चारा छावण्याचे प्रस्ताव दाखल
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30
बाळासाहेब जाधव, लातूर : लातूर जिल्ातील चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ ६ लाख १५० पशुधनासाठी ४ लाख २५ हजार ६ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे़ परंतू या चार्यावर पशुधनाचा प्रश्न भागणार नसल्याने नवीन वर्षात चारा छावणीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, जिल्ातील पहिली चारा छावणी अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथे सुरु करण्यात आली आहे़

जिल्ातील पहिली चारा छावणी अहमदपुरात चार्याचा प्रश्न : नवीन वर्षात दोन चारा छावण्याचे प्रस्ताव दाखल
ब ळासाहेब जाधव, लातूर : लातूर जिल्ातील चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ ६ लाख १५० पशुधनासाठी ४ लाख २५ हजार ६ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे़ परंतू या चार्यावर पशुधनाचा प्रश्न भागणार नसल्याने नवीन वर्षात चारा छावणीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, जिल्ातील पहिली चारा छावणी अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथे सुरु करण्यात आली आहे़ लातूर जिल्ातील लातूर, रेणापूर, उदगीर, देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा या दहा तालुक्यांतर्गत ६ लाख १ हजार ५० एवढे पशुधन असून, त्यासाठी ४ लाख २५ हजार ६ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे़ हा चारा चार महिने पुरेल एवढा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने भाकित केले असले तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ लातूर जिल्ातील दोन चारा छावणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आले आहे़ यापैकी अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथे कै़ लक्ष्मणराव गुटे, रुलर डेव्हलपमेंट फाऊंडेशन पुणेच्या वतीने शुक्रवारी जिल्ातील पहिली चारा छावणी सुरु केली आहे़ या परिसरात चार्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पहिल्याच दिवशी ३५० पशुधन या चारा छावणीमध्ये उपलब्ध झाले असून, त्या पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे़ पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार्या सेवाभावी संस्था, सहकारी कारखाने, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत या संस्थांना प्रती मोठ्या पशुधनासाठी ७० रुपये तर छोट्या पशुधनासाठी ३५ रुपये या प्रमाणे प्रतीदिवसाला अनुदान मिळणार आहे़ त्यामुळे चारा छावणी सुरु करणार्या संस्थेला ५०० पशुधनासाठी महिन्याकाठी ८ लाख ४० हजारांचा खर्च येणार आहे़ तसेच हा खर्च किमान दोन महिने स्वखर्चातून करावा लागणार आहे़ पशुधनाच्या चारा-पाण्यासाठी पुढे येणार्या संस्थांचे प्रस्ताव सुरु झाले असून, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, यातील पहिली चारा छावणी अहमदपूर तालुक्यातील मोघाव येथील कै़ लक्ष्मणराव गुटे यांच्या नावाने सुरु करण्यात आली आहे़ या छावणीमुळे परिसरातील ३५० पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे़ तर उर्वरित औसा तालुक्यातील भादा येथील एका संस्थेचाही प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, तिही चारा छावणी आठवडाभरात सुरु होणार आहे़आठवड्याला तहसीलदारांची भेट़़़लातूर जिल्ातील चारा छावण्या सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ नवीन वर्षात दोन चारा छावणीस मंजुरी मिळाली़ त्यातील एक चारा छावणी शुक्रवारी सुरुही झाली़ या चारा छावणीची जागा, तेथील सुविधा याची पाहणी करण्यासाठी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांचा दौरा दर आठवड्याला होणार असून, त्यांच्या नियंत्रणाखालीच या चारा छावणीच्याकामचे ऑडीट होणार होणार आहे़