शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

"आधी यमुनेचे पाणी पिऊन दाखवा, मग मी रुग्णालयात भेटेन", राहुल गांधींनी कुणाला दिलं खुलं चॅलेन्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:15 IST

याच वेळी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला...

सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बवाना येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपसह आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनाही निशाण्यावर घेतले. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. येथे घाणेरडे पाणी मिळते. महागडे पाणी विकत घ्यावे लागते, असे राहुल गांधी म्हणाले. याच वेळी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, "ते जिथे जातात तिथे धर्माविरुद्ध धर्म, जातीविरुद्ध जाती आणि भाषा विरुद्ध भाषा, असा वाद निर्माण करतात. केंद्रातील मोदी सरकारवर आरोप करताना राहुल म्हणाले, पूर्वी सार्वजनिक क्षेत्र असायचे. गरीबांसाठी जागा असायच्या. रोजगार मिळत होता. सर्व थांबले. खाजगीकरण झाले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे दुकानदार आणि छोटे व्यवसाय बंद पडले. भारतातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. मोदी आणि केजरीवाल सरकारच्या काळात रोजगार मिळू शकत नाही."

केजरीवाल यांच्यावर आरोप करताना राहुल म्हणाले, "केजरीवाल लांबलचक भाषणे देतात. ते पूर्वी लहान गाडीने फिरायचे. विजेच्या खांबावर चढायचे. मी स्वच्छ राजकारण आणेन, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दिल्लीत सर्वात मोठा दारू घोटाळा झाला. त्यांच्या पक्षाने आणि त्यांच्या लोकांनी तो केला. ते पाच वर्षांपूर्वी म्हणाले होते, यमुनेत स्नान करतील आणि पाणी पितील. पाच वर्षे झाली. आजपर्यंत केजरीवाल यांनी यमुनेचे पाणी प्यालेले नाही. आपल्याला घाणेरडे पाणी प्यावे लागते. केजरीवाल मात्र, शीशमहालात राहतात. स्वच्छ पाणी पितात आणि तुम्हाला खोटी आश्वासनं देतात.

"आपण रोजगार आणि प्रगतीसंदर्भात बोलतो. शीलाजींच्या काळात रस्ते बांधले गेले, विकास झाला, आम्ही खोटी आश्वासने देत नव्हतो. केजरीवाल आणि मोदी दोघेही २४ तास खोटी आश्वासने देतात. केजरीवाल म्हणाले होते, यमुनेचे पाणी पितील. मी केजरीवाल यांना आव्हान देतो की, आपण आज जाऊन यमुनेचे पाणी प्या. त्यानंतर मी तुम्हाला रुग्णालयात येऊन भेटेन," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी