शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस ‘अमृत’ आठवणी अन् ‘निवडणूक आयुक्त’ विधेयकाचा, संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी १७ सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 07:44 IST

Special Session Of Parliament: संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात नेमके काय होणार, याची विरोधी पक्षांसह देशवासीयांना उत्सुकता लागली असताना, बुधवारी विषयपत्रिका (अजेंडा) जाहीर करण्यात आली.

- संजय शर्मानवी दिल्ली - संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात नेमके काय होणार, याची विरोधी पक्षांसह देशवासीयांना उत्सुकता लागली असताना, बुधवारी विषयपत्रिका (अजेंडा) जाहीर करण्यात आली. त्यात १८ सप्टेंबरला पहिल्या दिवशी संविधान सभेपासून आजपर्यंतच्या संसदेच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे, तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती विधेयकांसह चार विधेयकेही मांडण्यात येणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने बुधवारी सांगितले. 

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत केंद्र सरकारने १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सायंकाळी ४.३० वाजता संसद भवनात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांच्या गटनेत्यांना बोलावले आहे. या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा सरकारकडून प्रथमच विरोधी पक्षांसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवक्ता दुरुस्ती विधेयक, राज्यसभेने मंजूर केलेले आणि लोकसभेत प्रलंबित असलेले वृत्तपत्रे आणि नियतकालिक नोंदणी विधेयक, टपाल कार्यालय विधेयक सूचीबद्ध केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नोत्तराचा तास आणि अशासकीय कामकाज होणार नाही.

अजेंड्यावर झाली चर्चा- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लोकसभेतील भाजपचे नेते, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल यांच्यात संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा झाली. - पाच दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात एक देश-एक निवडणूक, महिला आरक्षण, भारत विरुद्ध इंडिया, जी-२० चे यश, चंद्रयान-३ चे यश यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या बैठकीत पंतप्रधानांचे अभिनंदन - आगामी मध्य प्रदेश, छत्तीसगड निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पक्ष मुख्यालयात आयोजित करण्यात आली. - यावेळी जी-२० परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज पंतप्रधानांचे भाजप मुख्यालयात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्याची घोषणा केली. - प्रमुख नेत्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. त्यानंतर  केंद्रीय निवडणूक समितीची   बैठक पार पडली.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा