शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 06:29 IST

‘डिजिटल अटक’च्या गुन्ह्यांमध्ये देशातील पहिल्यांदाच शिक्षा झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या शिक्षा झाल्या.

डॉ. खुशालचंद बाहेती

कोलकाता/ लखनौ :डिजिटलअटक’च्या गुन्ह्यांमध्ये देशातील पहिल्यांदाच शिक्षा झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या शिक्षा झाल्या.

पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेपपार्था कुमार मुखर्जी या निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला ऑक्टोबर २०२४ मध्ये नऊ आरोपींनी व्हॉट्सॲपने संपर्क साधला. मुंबई पोलिस, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी मुखर्जी यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचे, मनी लाँड्रिंगचे आरोप केले आणि “डिजिटलअटक”करुन १ कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले.

प. बंगाल पोलिसांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये मोहम्मद इम्तियाज अन्सारीसह ९ जणांना अटक केली. या टोळीने देशात १०८ नागरिकांची १०० कोटींची फसवणूक केली. रणाघाट सायबर ठाण्याने यात २६०० पानी आरोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात कळ्याणी (प. बंगाल) न्यायालयाने ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २४ फेब्रुवारीला सुरू झालेल्या खटल्याचा निकाल साडेचार महिन्यांत लागला.

डॅाक्टरांचे ८५ लाख लुटलेएप्रिल २०२४ मध्ये किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ येथील वरिष्ठ फिजिशियन डॉ. सौम्या गुप्ता यांना अज्ञाताचा फोन आला. त्याने दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगत डॉ. गुप्तांच्या नावे असलेले एक पार्सल जप्त केल्याचे सांगितले. यात काही पासपोर्ट, एटीएम कार्डस् आणि १४० ग्रॅम एमडीएमए-असल्याचा आरोप होता.

कॉल बनावट सीबीआय अधिकाऱ्याकडे ट्रान्सफर केला. त्याने डॉ. गुप्तांना सात वर्षांची शिक्षा होईल, अशा धमक्या देत बँक तपशील, कागदपत्रे मिळविली. १० दिवस “डिजिटल अटक” करून चार खात्यांमध्ये ८५ लाख जमा केले. लखनौ सायबर पोलिसांनी मशौना (आजमगढ) येथील देवाशिष रायला अटक केली. १४ महिन्यांत खटल्याचा निकाल लागून रायला सात वर्षांची सक्तमजुरी, दंडाची शिक्षा झाली. देशात डिजिटल अरेस्टमधील ही पहिलीच शिक्षा आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमdigitalडिजिटलfraudधोकेबाजीArrestअटकCrime Newsगुन्हेगारी