पहिली कोळसाखाण रिलायन्सला
By Admin | Updated: February 15, 2015 01:18 IST2015-02-15T01:18:19+5:302015-02-15T01:18:19+5:30
कोळसा खाणींवरील सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणून कोळसा खाणपट्ट्यांचे खासगी उद्योगांना लिलावाने वाटप करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली.

पहिली कोळसाखाण रिलायन्सला
७९८ कोटींची बोली : १९ खाणपट्ट्यांसाठी ई-लिलाव सुरु
नवी दिल्ली: कोळसा खाणींवरील सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणून कोळसा खाणपट्ट्यांचे खासगी उद्योगांना लिलावाने वाटप करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली. त्यानुसार झालेल्या ई-लिलावात ७९८ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत रिलायन्स सिमेंट कंपनीने पहिली कोळसाखाण पटकावली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सियाल घोघरी खाणपट्ट्यासाठीच्या लिलावात रिलायन्स सिमेंटने हिंदुस्तान झिंक लि. आणि ओसीएल आयर्न अॅण्ड स्टील कंपनीला मात दिली. या खाणपटट्यात एकूण १,४०२ दशलक्ष टन कोळसासाठे असून त्यापैकी ५.९ दशलक्ष टन काढणे शक्य आहे. रिलायन्सने यासाठी प्रति टन १,४०२ रुपये या दराने बोली लावली होती. याआधी प्रशासकीय निर्णयाने ही खाण प्रिझम सिमेंट कंपनीस दिली गेली होती. ही खाण विजेखेरीज अन्य उद्योगांसाठी राखीव आहे.
लिलाव जोमाने सुरु आहे. ही पद्धत सरकारसाठी उत्तम आहे कारण यातून राज्यांना चांगला महसूल मिळेल.
-अनिल स्वरूप, कोळसा सचिव