शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ना सिक्योरिटी, ना ताफा; रुग्ण बनून सरकारी रुग्णालयात गेल्या IAS; समोर आलं धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 18:24 IST

IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा जिल्ह्यातील महिला एसडीएम (IAS) अचानक तपासणीसाठी आल्या तेव्हा खळबळ उडाली. IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही. मात्र या IAS असल्याचं समोर आल्यानंतर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. आरोग्य केंद्रात त्यांना अनेक त्रुटी आढळल्या.

फिरोजाबादच्या IAS कृती राज यांनी मंगळवारी (१२ मार्च) तपासणी करण्यासाठी गुपचूप दीदामई येथील शकीला नईम आरोग्य केंद्र गाठलं. त्या त्यांची कार हॉस्पिटलपासून लांब उभी करून सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे दाखल झाल्या. अशा स्थितीत त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही. फिरोजाबादच्या आरोग्य विभागात अनियमितता, भ्रष्टाचार आणि वाईट वर्तनाच्या तक्रारी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कृती राज यांच्याकडे ही तक्रार येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि अचानक पाहणी केली. दीदमई प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिले जात नसल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती. तपासणीसाठी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या तेव्हा गाडीतून खाली उतरताच त्यांनी ओढणीने चेहरा झाकून घेतला आणि सामान्य रुग्णाप्रमाणे लोकांशी चर्चा केली. 

औषधं तपासण्यासाठी त्या आत गेल्या असता एक्सपायरी डेट असलेली अनेक औषधं सापडली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रुग्णांशी असलेली वागणूकही वाईट असल्याचं दिसून आलं. हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचं दिसून आले. याबाबत त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

रुग्णालयातील कर्मचारी लोकांना उभं करून इंजेक्शन देत असल्याचं एसडीएम यांनी सांगितलं आहे. बेडवर खूप धूळ साचली होती. स्वच्छता नव्हती. डिलिव्हरी रूम आणि टॉयलेटमध्येही घाण आढळून आली. कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावचा अभाव होता. सध्या रिपोर्ट कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश