काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा गोळीबार, २ पोलिस जखमी

By Admin | Updated: December 24, 2015 16:32 IST2015-12-24T16:32:06+5:302015-12-24T16:32:06+5:30

दक्षिण काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले आहेत.

Firing of terrorists in Kashmir, 2 policemen injured | काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा गोळीबार, २ पोलिस जखमी

काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा गोळीबार, २ पोलिस जखमी

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. २४  - दक्षिण काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरा भागामध्ये ही घटना घडली. 

दोन जखमी पोलिसांमध्ये एक डीएसपी स्तरावरचा अधिकारी आहे. दोन्ही जखमींना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील तराल भागातील काही वॉंटेड दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिध्द केल्यानंतर हा हल्ला झाला. या दहशतवाद्यांवर रोख रक्कमेचे इनामही ठेवण्यात आले आहे. 
आठ डिसेंबरला पामपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते. २० नोव्हेंबरला दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षापथकांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. 

Web Title: Firing of terrorists in Kashmir, 2 policemen injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.