पाकिस्तानी पाणबुडीचा भारतीय नौकांवर गोळीबार

By Admin | Updated: October 15, 2015 15:51 IST2015-10-15T15:48:55+5:302015-10-15T15:51:39+5:30

गुरूवारी सकाळी पाकिस्तानी पाणबुडीतून गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ चार भारतीय नौकांवर गोळीबार करण्यात आला असून २४ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे.

Firing of Pakistani submarine Indian boats | पाकिस्तानी पाणबुडीचा भारतीय नौकांवर गोळीबार

पाकिस्तानी पाणबुडीचा भारतीय नौकांवर गोळीबार

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १५ -  गुरूवारी सकाळी पाकिस्तानी पाणबुडीतून गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ चार भारतीय नौकांवर गोळीबार करण्यात आला. तसेच या नौकांवरील २४ मच्छिमारांना पाकिस्तानी नौदलाने अटक केल्याचे समजते. 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जखाऊ बंदराजवळ असलेल्या भारतीय नौकांना पाकिस्तानी पाणबुडीने लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक मच्छिमार जखमी झाला आहे, तर आणखी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. 
गेल्या महिन्यात पाकिस्तानी नौदलाने गुजरातच्या किना-याजवळ एका भारतीय नौकेवर गोळीबार केला होता, ज्यात एक मच्छिमार मृत्यूमुखी पडला होता.

Web Title: Firing of Pakistani submarine Indian boats