अलिगढ विद्यापीठात गोळीबार, दोन विद्यार्थी ठार
By Admin | Updated: April 25, 2016 03:40 IST2016-04-25T03:40:15+5:302016-04-25T03:40:15+5:30
उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ परिसरात शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये उडालेला संघर्ष आणि परस्परांवर केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी मृत्युमुखी पडले.

अलिगढ विद्यापीठात गोळीबार, दोन विद्यार्थी ठार
अलिगढ : उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ परिसरात शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये उडालेला संघर्ष आणि परस्परांवर केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी मृत्युमुखी पडले. या हिंसाचारानंतर विद्यापीठ परिसरात जलद कृती दल तैनात करण्यात आले असून वसतिगृहे रिकामी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर मध्यरात्री हा हिंसाचार उफाळला. यावेळी दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांनी परस्परांवर गोळीबार केला, ज्यात माहताब नावाचा विद्यार्थी जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेला मोहम्मद वाकीफ याचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मूत्यू झाला. मुमताज वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यावर दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केला आणि त्याच्या खोलीला आग लावली. यानंतर पीडित विद्यार्थी संरक्षकाच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. ही बातमी अन्य विद्यार्थ्यांना कळताच ते वसतिगृहात आले. यावेळी आग लावणारे विद्यार्थीही तेथे हजर होते. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.