पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद

By Admin | Updated: November 6, 2016 21:24 IST2016-11-06T14:29:15+5:302016-11-06T21:24:56+5:30

आज सकाळी पुंछ जिल्ह्यातील मेंढर विभागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.

Firing again from Pakistan, two jawans martyred | पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद

>ऑनलाइन लोकमत 
जम्मू, दि. 5 -  बीएसएफकडून मिळत असलेल्या चोख प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार  अद्याप थांबलेला नाही. आज सकाळी पुंछ जिल्ह्यातील मेंढर विभागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दरम्यान, भारताने प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या काही चौक्यांचे नुकसान झाले आहे. 
"आज सकाळी पुंछमधील केजी विभागात पाकिस्तानकडून घुसखोरीचे दोन प्रयत्न झाले. यावेळी झालेल्या गोळीबारात लष्कराचा दोन जवान शहीद झाले," अशी माहिती लष्कराने दिली. या विभागात पाकिस्तानने सामान्य नागरिक आणि सैन्याला लक्ष करून अचानक गोळीबार सुरू केला. दरम्यान या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तसेच हा गोऴीबार अजूनही सुरू आहे. असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय सुरक्षा दलांकडून मिळालेल्या चोख प्रत्युत्तरानंतर दोन दिवस थांबलेला पाकिस्तानचा गोळीबार रविवारी पुन्हा सुरू झाला.  

Web Title: Firing again from Pakistan, two jawans martyred