आंध्रमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; ११ ठार, ७ जखमी
By Admin | Updated: October 21, 2014 03:17 IST2014-10-21T03:17:41+5:302014-10-21T03:17:41+5:30
आंध्र किनारपट्टीलगतच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील वकाटिप्पा गावात फटाके बनविण्याच्या कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात ११ ठार, तर अन्य ७ जण जखमी झाले़ मृतांत ९ महिलांचा समावेश आहे़

आंध्रमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; ११ ठार, ७ जखमी
हैदराबाद : आंध्र किनारपट्टीलगतच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील वकाटिप्पा गावात फटाके बनविण्याच्या कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात ११ ठार, तर अन्य ७ जण जखमी झाले़ मृतांत ९ महिलांचा समावेश आहे़
फटाके बनविताना कुठल्याशा रासायनिक प्रक्रियेमुळे हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे़ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येथून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर काकीनाडा जिल्हा मुख्यालयानजीक वकाटिप्पा गावातील खासगी कारखान्यात दुपारी २.४५ च्या सुमारास हा स्फोट झाला़
यावेळी १८ मजूर या ठिकाणी काम करीत होते़ यापैकी ११ जण ठार झाले़ ९ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडला़ अनेक मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला होता़ (वृत्तसंस्था)