गोठ्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:32+5:302015-02-14T23:51:32+5:30
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली.

गोठ्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान
म र्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ गौतमनगर आहे. या ठिकाणी अशोक स्वामीनाथ पांडे यांच्या मालकीचा म्हशीचा गोठा आहे. गोठ्यात जवळपास १६ जनावरे होती. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक गोठ्याला आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली. मूर्तिजापूर पोलिसांनी घटनेचा पंचनाम केला. आगीत साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी येथून जाणारे डॉ.आर.जी. राठोड महाविद्यालयाचे विद्यार्थी आकाश भटकर, मो. जावेद, कुलदीप जामनिक, दिनेश दुबे, नानकराम पांडे यांनी सहकार्य केले. बॉक्स...गोठ्यातून धूर येत असल्याचे तेथून जात असलेली विद्यार्थिनी तेजस्विनी प्रकाश हेगंड हिला दिसले. तिने तातडीने धाव घेऊन म्हशींना गोठ्याबाहेर काढले. त्यामुळे म्हशींचे प्राण वाचले. फोटो:१५सीटीसीएल ०४,03 मूर्तिजापूर येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत गोठा खाक झाला.