रेल्वे स्टेशनवर आग
By Admin | Updated: July 1, 2016 05:29 IST2016-07-01T05:29:23+5:302016-07-01T05:29:23+5:30
अमृतसर रेल्वे स्थानकाच्या तिकीट आरक्षण केंद्रावर गुरुवारी आग लागल्याने मेन सर्व्हर जळून खाक झाला

रेल्वे स्टेशनवर आग
अमृतसर : अमृतसर रेल्वे स्थानकाच्या तिकीट आरक्षण केंद्रावर गुरुवारी आग लागल्याने मेन सर्व्हर जळून खाक झाला तर इतर उपकरणांचेही मोठे नुकसान झाले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी मात्र झाली नाही. रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि काही क्षणांतच पूर्ण आरक्षण विभागात तिचे लोण पसरले.
खिडकीवर बसविलेल्या आठ संगणकांशिवाय मेन सर्व्हरचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, प्रवासी आॅनलाइन बुकिंग करू शकतात
तसेच तिकीट विभागाच्या दुसऱ्या क्षेत्रातूनही तिकीट घेऊ शकतात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)