शहरात तीन ठिकाणी आगीच्या घटना

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:17+5:302015-02-14T23:52:17+5:30

Fire incidents in three places in the city | शहरात तीन ठिकाणी आगीच्या घटना

शहरात तीन ठिकाणी आगीच्या घटना

>नागपूर : शहरात तीन ठिकाणी शनिवारी आग लागण्याच्या घटना घडल्या. यात लाखोंची हानी झाल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली.
कमाल चौकानजिकच्या बाळाभाऊ पेठ येथील गणोबा महाराज देवस्थान लगतच्या घराला दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. वेळीच आग आटोक्यात आली नसती तर ती आजूबाजूला पसरून मोठी हानी होण्याचा धोका होता.
जागनाथ बुधवारी येथील अनिल शाहू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली. यात घरातील किमती सामान नष्ट झाले. तसेच वांजरा येथे आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचल्यानंतर विभागाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Fire incidents in three places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.