आंध्रप्रदेशमध्ये गेल पाईपलाईनला आग, १४ ठार
By Admin | Updated: June 27, 2014 18:34 IST2014-06-27T08:58:24+5:302014-06-27T18:34:45+5:30
आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गेल (गॅस प्राधिकरण लिमिटेड) पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत १४ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत.

आंध्रप्रदेशमध्ये गेल पाईपलाईनला आग, १४ ठार
ऑनलाइन टीम
काकीनाडा, दि. २७ - आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गेल (गॅस प्राधिकरण लिमिटेड) पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ११ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास नगरम गावात पाईपलाईन प्रथम स्फोट झाला व भीषण आग लागली. या आगीची तीव्रता एवढी जासत् होती की आजूबाजूच्या ५० घरेही जळाली.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अमालपूर क्षेत्रात अग्नितांडव सुरू झाले. गेलच्या पाईपलाइनमध्ये स्फोट झाल्यानं संपूर्ण परिसरात आगीचे लोळ उठून धुराचे साम्राज्य पसरले. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, तसेच पाईपलाईनमधून गॅस पुरवठा खंडित करण्यात आला. त्यांच्या अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे आटोक्यात आली, मात्र त्यात १४ जणांचा नाहक बळी गेला. दरम्यान सुरक्षेच्या कारणासाठी नगरम व आजूबाजूची गावेही रिकामी करण्यात आली आहेत. जखमींवर जवळच्या काकीनाडा आणि अमलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.