काश्मिरात चकमक, दोन दहशतवादी ठार
By Admin | Updated: January 19, 2015 03:02 IST2015-01-19T02:42:29+5:302015-01-19T03:02:16+5:30
उत्तर काश्मीरच्या सोपोर येथे सुरक्षा दलांसोबत उडालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

काश्मिरात चकमक, दोन दहशतवादी ठार
श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या सोपोर येथे सुरक्षा दलांसोबत उडालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. याबरोबरच मागील चार दिवसांपासून सुरक्षा दलाने चालविलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आठ झाली आहे.
सोपोरजवळच्या सैदपुरा गावात काही दहशतवादी दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस आणि सुरक्षा दलांनी शनिवारी रात्री या गावात संयुक्त मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि सुरक्षा दलांच्या जवानांनीही त्यांना गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. या मृत दहशतवाद्यांच्या ताब्यातील दोन एके-४७ रायफल्स, एक पिस्तूल, दोन युबीजीएल आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. लष्कर-ए-तोयबाचा डिव्हिजनल कमांडर कारी असादुल्ला आणि जैश-ए-मोहंमदचा मोहंमद रमजान अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. (वृत्तसंस्था)