तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग
By Admin | Updated: October 21, 2016 17:10 IST2016-10-21T17:09:32+5:302016-10-21T17:10:28+5:30
गांधी पार्क परिसरातील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. पाच लोकांना बाहेर काढण्यात आलं असून बचावकार्य सुरु आहे.

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग
ऑनलाइन लोकमत
कोईम्बतूर, दि. 21 - गांधी पार्क परिसरातील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीनंतर काहीजण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पाच लोकांना बाहेर काढण्यात आलं असून अद्याप बचावकार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावकार्य अद्यापही सुरु आहे.
गुरुवारी शिवकाशी येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत नऊ जण ठार झाले होते. गोदामातील फटाके एकीकडून दुसरीकडे हलवत असताना ही आग लागली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी पुन्हा अशीच घटना घडली आहे.
Fire breaks out in a cracker godown in Gandhi park area of Coimbatore, TN.10 ppl feared trapped, fire tenders at spot. Rescue ops underway
— ANI (@ANI_news) October 21, 2016