शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 11:56 IST

Prashant Kishor : पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे

ठळक मुद्देराजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे प्रशांत किशोर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 'बिहार की बात' या कॅम्पेनची प्रशांत किशोर यांनी चोरी केल्याचा एका इंजिनियने केला आरोप

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी झालेल्या तीव्र मतभेदांनंतर जनता दल युनायटेड पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. जेडीयूचे माजी उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूर्वी चंपारण्य जिल्ह्यातील एका इंजिनियने 'बिहार की बात' या त्यांच्या कॅम्पेनची प्रशांत किशोर यांनी चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे.या प्रकरणी तक्रार दाखल करणारे इंजिनियर शाश्वत गौतम यांनी सांगितले की, 'काही काळापूर्वी मी बिहार की बात नावाचा एक प्रोजेक्ट बनवला होता. त्याच्या लाँचिंगची तयारी सुरू होती. मात्र त्यादरम्यान माझ्याकडी एक कर्मचारी ओसामा याने नोकरी सोडली आणि बिहार की बात कँपेनचा संपूर्ण कंटेंट प्रशांत किशोर यांना दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी तो आपल्या वेबसाइटवर टाकून ब्रँडिंग सुरू केले.'

मी माझ्याकडील संपूर्ण कंटेंट जानेवारी महिन्यात आपल्या वेबसाईटवर अपलोड केला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी फेब्रुवारी महिन्यात आपली वेबसाईट लाँच केली, असे शाश्वत गौतम यांनी सांगितले. दरम्यान, बिहार की बात या कार्यक्रमाचे संपूर्ण डिझाइन आपण प्लॅन केले होते, असा दावाही गौतम यांनी केला आहे.

संबंधित बातम्या 

बिहारमध्ये केजरीवालांच्या साथीत प्रशांत किशोर यांचा राजकीय प्रयोग ?

AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!

प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्टी; नितीश कुमारांवर निशाणाआता या प्रकरणी पाटणा येथील पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर भादंवि कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गौतमने दिलेल्या पुराव्यांचा तपास करत आहेत. प्रशांत किशोर यांच्यावर आरोप करणारे शाश्वत गौतम हे पेशाने इंजिनियर असून, ते बरीच वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होते.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी