अभिनेत्री सनी लिऑन विरोधात एफआयआर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 13:14 IST2016-02-10T13:14:10+5:302016-02-10T13:14:10+5:30
'मस्तीझादे' चित्रपटातील एका दृश्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या म्हणून सनी लिऑन विरोधात दिल्लीच्या आदर्श नगर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.

अभिनेत्री सनी लिऑन विरोधात एफआयआर दाखल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - आपल्या बोल्ड अदांमुळे चर्चेत रहाणारी अभिनेत्री सनी लिऑन पुन्हा एकदा वादात सापडली आहे. 'मस्तीझादे' चित्रपटातील एका दृश्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या म्हणून सनी लिऑन विरोधात दिल्लीच्या आदर्श नगर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
पण यावेळी सनी एकटी आरोपी नसून सनीबरोबर तिचे सहकलाकार वीर दास, तृषार कपूर आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या नावाचा सुद्धा एफआयआरमध्ये समावेश आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार 'मस्तीझादे' चित्रपटातील एका दृश्यामध्ये चित्रपटातील कलाकार मंदिरात कंडोम वापराची चर्चा करत आहेत.
या दृश्याप्रकरणी हा एफआयआर दाखल झाला आहे. एफआयआरनुसार चौकशी सुरु झाली असून, तक्रारदाराचे नाव अजून समजलेले नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवडयांनी ही तक्रार दाखल झाली आहे.