दादरी हत्याकांड, अखलाकच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करा- कोर्ट
By Admin | Updated: July 14, 2016 18:19 IST2016-07-14T18:07:12+5:302016-07-14T18:19:35+5:30
जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अखलाकच्या विरोधात सुरजपूर कोर्टानं जर्चा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचं आदेश दिले आहेत

दादरी हत्याकांड, अखलाकच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करा- कोर्ट
ऑनलाइन लोकमत
ग्रेटर नॉएडा, दि. 14 - दादरी कांडात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अखलाकच्या कुटुंबीयांविरोधात सुरजपूर कोर्टानं जर्चा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचं आदेश दिले आहेत. अखलाकच्या कुटुंबीयांतील 7 सदस्यांच्या विरोधात गोमांस बाळगल्याप्रकरणी कोर्टानं एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी विजयकुमार यांनी पोलिसांना एफआयआर दाखल करून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बिसाडामधील काही नागरिकांनी अखलाकच्या कुटुंबीयांनी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून सीआरपीसीनुसार कलम 156(3) अंतर्गत कोर्टाकडे कारवाईसाठी केलेल्या अर्जातून कोर्टानं हे आदेश दिला आहे.
(दादरी हत्याकांड: इखलाखच्या घरात बीफ नव्हे मटण होतं..)
65 वर्षीय सुरजपाल सिंग या गावक-यानं फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे अखलाकच्या कुटुंबीयांनी गोमांस बाळगल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून अखलाक, त्याची पत्नी इकरामन, आई असघरी, भाऊ जान मोहम्मद, मुलगी शहिस्ता, मुलगा डॅनिश यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची कोर्टानं आदेश दिल्याची माहिती यावेळी 65 वर्षीय सुरजपाल सिंग यांचे वकील राजीव त्यागी यांनी सांगितले आहे. कोर्टानं पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितल्याप्रकरणी आनंदी असल्याची प्रतिक्रियाही वकील त्यागींनी दिली आहे.