शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मॉब लिन्चिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींविरोधात एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 08:57 IST

पंतप्रधानांची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप

नवी दिल्ली: मॉब लिन्चिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रामचंद्र गुहा, मणीरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तीमत्त्वांचा समावेश आहे. या व्यक्तींनी मॉब लिन्चिंगबद्दल चिंता व्यक्त करत मोदींना खुलं पत्र लिहिलं होतं. मॉब लिन्चिंग प्रकरणात सेलिब्रिटींनी मोदींना खुलं पत्र लिहिल्यानंतर बिहारच्या मुझफ्फरपूरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी निकाल देत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २० ऑगस्टला या प्रकरणी आदेश दिल्याचं ओझा यांनी सांगितलं. ओझा यांनी त्यांच्या याचिकेत पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ५० व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला होता. सेलिब्रिटींनी लिहिलेल्या पत्रातून देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आणि पंतप्रधान मोदींच्या कामाला कमी लेखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये देशद्रोह, सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या कलमांचा समावेश आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रथितयश कलाकारांनी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींना खुलं पत्र लिहिलं होतं. देशात वाढत चाललेल्या मॉब लिन्चिंगच्या घटना रोखण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलं होतं. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची आणि आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती. पंतप्रधानांनी मॉब लिन्चिंगच्या घटनांचा केवळ निषेध करुन चालणार नाही. तर त्यांनी या प्रकरणात कारवाई करायला हवी, असं सेलिब्रिटींनी पत्रात म्हटलं होतं.  

टॅग्स :LynchingलीचिंगNarendra Modiनरेंद्र मोदीbollywoodबॉलिवूड