ललित कोल्हेंना सल्लागारपदावरून हटविले
By Admin | Updated: February 19, 2016 22:26 IST2016-02-19T22:26:16+5:302016-02-19T22:26:16+5:30
जळगाव- रेमंड कंपनीमधील कामगार उत्कर्ष सभेच्या प्रमुख सल्लागार पदावरून नगरसेवक ललित कोल्हे यांना हटविल्याचे पत्र कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिले आहे.

ललित कोल्हेंना सल्लागारपदावरून हटविले
ज गाव- रेमंड कंपनीमधील कामगार उत्कर्ष सभेच्या प्रमुख सल्लागार पदावरून नगरसेवक ललित कोल्हे यांना हटविल्याचे पत्र कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिले आहे. कोल्हे यांनी कामगार विरोधी काम केल्याने त्यांची सल्लागारपदी केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे जितेंद्र जोशी यांनी म्हटले आहे. २०१४ मध्ये कोल्हे यांची कामगार उत्कर्ष सभेच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. तसा करार कंपनीसोबत २०१४ मध्ये झाला. २०१७ पर्यंत हा करार कायम राहणार आहे. त्यामुळे मी सल्लागारपदी कायम राहणार आहे. असे केव्हाही पदावरून हटविता येणार नाही, असे ललित कोल्हे यांनी सांगितले.आमदार भोळेंची नियुक्तीकामगार उत्कर्ष सभेने प्रमुख सल्लागारपदी आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती केली आहे. या पुढे आमदार भोळे व जितेंद्र जोशी यांच्याशी चर्चा करावी, अशा आशयाचे पत्र उत्कर्ष सभेने रेमंड व्यवस्थापनाला पाठविले आहे. कामबंद आंदोलनापासून दुरावाकाही दिवसांपूर्वी रेमंडमध्ये कामगारांनी महागाई भत्ता मिळावा व सु्या वाढवून द्याव्यात यासाठी आठ तास कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात ललित कोल्हे यांनी मध्यस्थी करून सु्या वाढवून देण्याचा निर्णय घेण्यास व्यवस्थापनाला भाग पाडले होते. परंतु करार झालेला असल्याने २०१७ पर्यंत महागाई भत्ता देता येणार नाही. करार मोडणे बेकायदेशीर ठरेल, असे सांगत कंपनीने महागाई भत्ता देण्यास असमर्थता दाखविली होती. याविरोधात कंपनीमधील काही पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त करीत कामगार उत्कर्ष सभेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती. यानंतर कोल्हे यांना हटविण्यात आल्याची माहिती आहे.