कोलकाता : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविले जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य शोधण्याचे आवाहन केले आहे़नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी याबाबत आपली भूमिका मांडली़ आमच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य नेताजींना भारतरत्न देण्याच्या विरोधात आहे़ यापेक्षा नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य शोधा़ नेताजी १९४५ पासून गायब आहेत़ तुम्ही त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविणार असाल तर त्यांचा मृत्यू कधी झाला, हे तुम्हाला सांगावे लागेल़ पण याचे पुरावे कुठे आहेत? असा सवाल चंद्रकुमार यांनी केला़ नेताजींच्या गायब होण्यामागच्या सत्याचा खुलासा करणे़, यासंदर्भातील शासकीय दस्तऐवज सार्वजनिक करणे हाच नेताजींचा सर्वोच्च सन्मान ठरेल़ आमच्या कुटुंबात सुमारे ६० सदस्य आहेत़ यापैकी कुणीही नेताजींच्या वतीने भारतरत्न स्वीकारण्यास इच्छुक नाही, असा दावाही त्यांनी केला़(वृत्तसंस्था)
बेपत्ता होण्यामागचे रहस्य आधी शोधा
By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST