रक्तपेढी शोधा मोबाइल अॅपवर
By Admin | Updated: June 16, 2015 04:39 IST2015-06-16T04:15:18+5:302015-06-16T04:39:10+5:30
केंद्र सरकारने जागतिक रक्तदान दिनानिमित्त रविवारी ‘मोबाइल ब्लड बँक अॅप’ सेवा कार्यान्वित केली. देशात कुठेही आपल्या नजीकच्या रक्तपेढीविषयीची माहिती

रक्तपेढी शोधा मोबाइल अॅपवर
सेवा झाली कार्यान्वित
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जागतिक रक्तदान दिनानिमित्त रविवारी ‘मोबाइल ब्लड बँक अॅप’ सेवा कार्यान्वित केली. देशात कुठेही आपल्या नजीकच्या रक्तपेढीविषयीची माहिती मिळविण्यासाठी हे ‘मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे.
या अॅप्लिकेशन अंतर्गत आता नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन कौन्सिलतर्फे देशातील सर्व २७६० परवानाधारक रक्तपेढ्यांची डिक्शनरी राष्ट्रीय आरोग्य पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. दिल्लीतील सर्व ७६ रक्तपेढ्या आणि देशभरातील ५२४ रक्तपेढ्यांची माहिती सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवानाधारक उर्वरित रक्तपेढ्यांची माहिती पोर्टलवर टाकण्याचे काम वेगाने सुरू असून, ही माहितीही लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे सरकारने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.