शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा दिलासा ! पेट्रोल, डिझेल अन् केरोसीनच्या भावात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 13:03 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा फायदा

ठळक मुद्देस्वयंपाक गॅसचे (एलपीजी) दर स्थिर ठेवण्यात यश

पिंपरी : पेट्रोल, डिझेल, केरोसीनच्या दारात झालेली घट आणि स्वयंपाक गॅसचे (एलपीजी) दर स्थिर ठेवण्यात यश आल्याने सामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये गेल्या महिनाभरात प्रतिलिटरमागे एक ते तीन रुपयांनी घट झाली असून, केरोसीनचे भाव पावणेतेरा रुपयांनी घटले आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील डिझेलच्या किरकोळ विक्री किंमतीत सप्टेंबरमध्ये २.९३ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९७ पैशांनी घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातही डिझेलच्या किमती १७ पैशांनी घटल्या असून, पेट्रोलचे भाव मात्र स्थिर आहेत. घटत्या इंधन दराचा फायदा वाहनचालकांना मिळाला आहे. त्यातही डिझेलच्या किमतीत घट झाल्याने मालवाहतुकदारांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे (कोविड १९) जगभरात टाळेबंदी लागू होती. मागणी घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलचे दर शुन्य डॉलर पर्यंत खाली आले होते. या काळात घटलेल्या इंधन दराचा फायदा आता स्थानिक बाजारपेठेत दिसून येत आहे. 

घरगुती स्वयंपाक गॅसच्या दरात जुलै २०२० पासून कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून या काळात दरमहा सरासरी १३ कोटी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच, घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवल्याने कुटुंबाना त्याचा फायदा झाला आहे. 

रास्त धान्य दुकानामार्फत वितरित केल्या जाणाऱ्या केरोसीनच्या दारात मोठ्याप्रमानात घट झाली आहे. फेब्रुवारी २०२० पासून  केरोसीनच्या दरात लिटरमागे तब्बल १२.७३ रुपयांची घट झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस केरोसीनच्या दार २.१९ रुपयांनी खाली आले आहेत. केरोसीनचा प्रतिलिटर दर २५.८४ वरून २३.६५ रुपया पर्यंत खाली आला आहे. केरोसीन ऐवजी एलपीजी वापरास प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे केरोसीनची मागणी घटल्याने दरात सातत्याने घट होत असल्याचे इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCylinderगॅस सिलेंडरPetrolपेट्रोलFamilyपरिवारcorona virusकोरोना वायरस बातम्या