श्रीनगर : मुंबईतील २६/ ११ च्या हल्ल्यासाठी पैसा पोहोचविणारा गट आणि फिरदौस अहमद शाह गिलानी यांचा निकटचा संबंध दर्शविणारी कडी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उलगडली आहे. फिरदौस हे सय्यद अली शाह यांच्या जहाल हुरियत कॉन्फरन्सचे सदस्य आहेत.काश्मीर खोऱ्यात काळा पैसा पांढरा करण्यासंबंधी(मनी लाँड्रिंग) पहिले आरोपपत्र दाखल करणाऱ्या ईडीने डेमॉक्रॅटिक पॉलिटिकल मुव्हमेंटचे अध्यक्ष असलेल्या फिरदौस यांना २००७ ते २०१० या काळात तीन कोटींपेक्षा जास्त रुपये मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. हा पैसा इटलीच्या ब्रेसिया शहरातील ‘मदिना ट्रेडिंग’ ने पाठवला असून पाकव्याप्त काश्मिरातील जावेद इक्बाल हे पाठवणाऱ्याचे नाव आहे. २००९ मध्ये इटली पोलिसांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. या कंपनीने इक्बालच्या नावावर किमान ३०० वेळा पैसा पाठविला होता. एखाद्याच्या नावावर एवढ्या वेळा पैसा हस्तांतरित होण्याची ही पहिलीच वेळ असावी. (वृत्तसंस्था)
मुंबई हल्ल्यासाठी आर्थिक रसद; हुरियतच्या फिरदौस शाहचा संबंध
By admin | Updated: July 19, 2015 23:48 IST