शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

देश आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत सापडलाय- डेरेक ओब्रायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 14:23 IST

देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीनंतरच्या काळाप्रमाणे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: देशातील काही राज्यांमध्ये अचानकपणे निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांमध्ये देशातील परिस्थिती पूर्ववत होईल, असा दावा त्यावेळी मोदींनी केला होता. मात्र, आता दीड वर्ष उलटूनही ही समस्या कायम आहे. ही परिस्थिती म्हणजे देश आर्थिक आणीबाणीत सापडल्याचे द्योतक आहे, अशी टीका डेरेक ओब्रायन यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात पैशांची चणचण निर्माण झाली होती. एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर रांग लावावी लागत होती. आता पुन्हा नोटाबंदीमध्ये जी परिस्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून एटीएममध्ये पैशांचा तुटवडा पाहायला मिळतो आहे. याचबरोबर पूर्व महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्येही कॅश कमी असल्याच्या तक्रारी समोर आल्या. दिल्ली-एनसीआरमध्येही लोकांना एटीएममध्ये चकरा माराव्या लागत आहेत. तसंच गुडगावमधील 80 टक्के एटीएम कॅशलेस झाले आहेत. नोटाबंदीनंतर जवळपास 5 लाख करोड रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या गेल्या. या नोटा चलनात आल्यानंतर मोठ्याप्रमाणात नोटांची चणचण दूर झाली. पण आता पुन्हा हे संकट वाढताना दिसतं आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बँकांचं म्हणणं आहे.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNarendra Modiनरेंद्र मोदीtmcठाणे महापालिका