शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रीमिलेअरसाठी आर्थिक निकष एकमेव आधार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:00 IST

सर्वोच्च न्यायालय : हरियाणा सरकारची अधिसूचना केली रद्दबातल

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राज्यांना  केवळ आर्थिक निकषावर इतर मागासवर्गीयांत (ओबीसी) क्रीमिलेअर  निर्धारित करता येऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारची १७ ऑगस्ट २०१६ची अधिसूचना रद्द करून नव्याने क्रीमिलेअरची व्याख्या निश्चित करण्यास सांगितले.  मागासवर्गीयांतर्गत क्रीमिलेअर निश्चित करण्यापूर्वी आर्थिक निकषाव्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक आणि अन्य घटकही विचारात घ्यावेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्या. एल. नागेश्वर  राव आणि अनिरुद्ध बोस यांच्या न्यायपीठाने हरियाणा सरकारची अधिसूचना रद्द करताना म्हटले की, इंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी जारी केलेल्या  निर्देशांचे सरासर उल्लंघन आहे.  हरियाणा सरकारच्या अधिसूचनेनुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत आहे, अशांना  नोकरीत आरक्षण आणि शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात आले होते.

मागासवर्ग कल्याण महासभा (हरियाणा) इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला. याचिकांत हरियाणा सरकारच्या २०१९ आणि २०१८च्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले होते. ही अधिसूचना केवळ आर्थिक निकषाच्या आधारे जारी करण्यात आली होती. त्यामुळे ती रद्दबातल करण्यासाठी हाच पुरेसा आधार आहे.

क्रीमिलेअर निर्धारित करण्यासंबंधी इंद्रा साहनी प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयातील सिद्धांताचे पालन करून तीन महिन्यांच्या आत २०१६च्या अधिनियमान्वये नवीन अधिसूचना जारी करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला दिले आहेत.न्यायपीठाने स्पष्ट केले की, आम्ही हरियाणा सरकारची २०१६ची अधिसूचना रद्दबातल केली आहे. तेव्हा २०१८च्या अधिसूचनेच्या वैधतेचा निपटारा करण्याची गरज नाही. कारण २०१८ची अधिसूचना पूर्णत: २०१६च्या अधिसूचनेवर आधारित आहे. 

नॉन क्रीमिलेअरमध्येही होते उपवर्गीकरण nहरियाणा सरकारच्या २०१६च्या अधिसूचनेत सहा लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या ओबीसी प्रवर्गातील लोकांना क्रिमिलेअर घोषित असून त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. याशिवाय नॉन क्रीमिलेअरमध्येही उपवर्गीकरण करण्यात आले होते.nया धोरणानुसार तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांचा एक समूह करण्यात आला होता, तर, तीन ते सहा लाखदरम्यान उत्पन्न असलेल्या लोकांचा दुसरा समूह करण्यात आला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय