शेतकर्‍यांना सोसायटीची आर्थिक मदत नवा उपक्रम : ७ लाख ४२ हजारांचे वाटप

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:08+5:302016-03-03T01:57:08+5:30

नरसिंह कद्रे, मुरूड : दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आपल्याकडून मदत व्हावी म्हणून मुरूड येथील विविध कार्यकारी संस्थेने आपल्या उत्पन्नातून कर्जदार सभासद शेतकर्‍यांना दुष्काळी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेऊन मंगळवारी ७ लाख ४२ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे़ संस्थेने पिचलेल्या शेतकर्‍यांना अनुदानाच्या रूपातून आर्थिक मदतीचा हात दिल्याने संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे़

Financial assistance for the farmers. New venture: 7 lakh 42 thousand distributed | शेतकर्‍यांना सोसायटीची आर्थिक मदत नवा उपक्रम : ७ लाख ४२ हजारांचे वाटप

शेतकर्‍यांना सोसायटीची आर्थिक मदत नवा उपक्रम : ७ लाख ४२ हजारांचे वाटप

सिंह कद्रे, मुरूड : दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आपल्याकडून मदत व्हावी म्हणून मुरूड येथील विविध कार्यकारी संस्थेने आपल्या उत्पन्नातून कर्जदार सभासद शेतकर्‍यांना दुष्काळी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेऊन मंगळवारी ७ लाख ४२ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे़ संस्थेने पिचलेल्या शेतकर्‍यांना अनुदानाच्या रूपातून आर्थिक मदतीचा हात दिल्याने संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे़
गेल्या दोन- तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असल्याने पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे़ यंदा तर दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यामुळे शेती व्यवसाय करणे शेतकर्‍यांना परवडेनासे झाले आहे़ परिणामी, शेतकरी प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी कोडमलून गेला आहे़ सध्या शेतकरी व पशूपालकांना चारा, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ खरीपाबरोबरच रबी हंगामही वाया गेल्याने शेतकरी नैराश्येत सापडले आहेत़ शेतकर्‍यांची ही अवस्था येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने जाणून घेऊन कर्जदार शेतकरी सभासदांसाठी संस्थेच्या नफ्यातून अनुदान वाटपाचा निर्णय घेतला़
मंगळवारी येथील शिवाजीराव नाडे यांच्या हस्ते ७४२ कर्जदार सभासद शेतकर्‍यांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या धनादेश देण्यात आले़ यावेळी माजी अध्यक्ष कल्याणराव नाडे, हरिभाऊ नाडे, चंद्रकांत कणसे, वैजनाथ कोपरकर, भागवत नाडे व संस्थाध्यक्ष वैजनाथ नाडे आदी उपस्थित होते़
चौकट़़़
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे़ शेतकर्‍यांना नेहमी सोसायटी कर्ज देते व त्याची परतफेड करुन घेते़ परंतु, सध्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत करणे गरजेचे असल्याचे जाणून घेऊन प्रत्येकी एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे वाटप करण्यात येत असल्याचे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले़

Web Title: Financial assistance for the farmers. New venture: 7 lakh 42 thousand distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.