वित्त सचिव मायाराम यांची बदली

By Admin | Updated: October 17, 2014 02:43 IST2014-10-17T02:43:52+5:302014-10-17T02:43:52+5:30

येत्या फेब्रुवारीत सादर होणा:या आपल्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या तयारीत गुंतलेल्या मोदी सरकारने अर्थमंत्रलयात एक नवी टीम आणली आह़े

Finance Secretary Mayaram's replacement | वित्त सचिव मायाराम यांची बदली

वित्त सचिव मायाराम यांची बदली

नवी दिल्ली : येत्या फेब्रुवारीत सादर होणा:या आपल्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या तयारीत गुंतलेल्या मोदी सरकारने अर्थमंत्रलयात एक नवी टीम आणली आह़े याअंतर्गत अर्थमंत्रलयात अनेक नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून वित्त सचिव अरविंद मायाराम यांची बदली करण्यात आली आह़े त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचे समजल्या जाणा:या पर्यटन मंत्रलयात पाठविण्यात आले आह़े तर अमेरिकेत कार्यरत अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांना मुख्य आर्थिक सल्लागारपदी नेमण्यात आले 
आह़े
ऑक्सफर्डमध्ये शिकलेले सुब्रमण्यम आयआयएम अहमदाबाद आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजचे विद्यार्थी आहेत़ आंतरराष्ट्रीय नाणो निधीत त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. रघुराम राजन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर बनल्यानंतर अर्थमंत्रलयातील मुख्य आर्थिक सल्लागाराचे पद गत एक वर्षापेक्षा अधिक काळापासून रिक्त होत़े मायाराम हे अर्थमंत्रलयाच्या 
चार सचिवांपैकी सर्वाधिक ज्येष्ठ 
होत़े त्यांच्याकडे वित्त आणि 
आर्थिक व्यवहार दोन्हींची जबाबदारी होती़ आधीच्या काँग्रेसप्रणित 
संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती 
केली होती़
31 ऑक्टोबर 2क्15 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या मायाराम यांच्याकडे संपूर्ण वर्षभराचा कार्यकाळ आह़े आता त्यांच्याकडे पर्यटन सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आह़े मायाराम यांच्या जागेवर नवे वित्त सचिव म्हणून राजीव महर्षी यांची नियुक्ती करण्यात आली आह़े
 1978 च्या बॅचचे अधिकारी असलेले राजीव महर्षी सध्या राजस्थानचे मुख्य सचिव आहेत़ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते सेवानिवृत्त होत आह़े त्यामुळे पुढील सुमारे 1क् महिने ते वित्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत़ 
 अर्थमंत्रलयात तूर्तास चार सचिव आहेत़ यात आर्थिक व्यवहार, खर्च, महसूल आणि आर्थिक सेवा अशी विभागणी असत़े चारपैकी एका सचिवाला सेवाज्येष्ठतेनुसार वित्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात येत़े अर्थमंत्रलयाने 2क्15-16 च्या अर्थसंकल्पाची तयारी केली आह़े येत्या फेब्रुवारीत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल़  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च् मध्यप्रदेश कॅडरच्या 198क् व्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रभू दयाल मीणा यांना माजी सैनिक कल्याण विभागाचे तर उत्तर प्रदेश कॅडरच्या 1981 बॅचचे अनुज कुमार बिश्नोई यांना जलस्नेत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रलयाचे सचिवपद देण्यात आले आह़े 
 
च्केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर करण्यात आलेला सर्वांत मोठा बदल ठरला आहे. आर्थिक धोरणांना आपल्या गरजेनुसार आकार देता यावा यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना विश्वासातील टीम हवी होती. या पाश्र्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.
 
 एकूण 20 नव्या नियुक्त्या
च्फेरबदलांतर्गत एकूण 2क् नव्या नियुक्त्या करण्यात आल्या़ यात एक तृतीयांश सचिव स्तराच्या आहेत़ उत्तर प्रदेश कॅडरच्या 1981 च्या बॅचचे अनिल स्वरूप यांना नवे कोळसा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आह़े 
च्सिक्कीम कॅडरच्या 1977 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आलोक रावत यांना प्रशासकीय सुधार आणि सार्वजनिक तक्रार व पेन्शन विभागाचे नवे सचिवपद देण्यात आले आह़े

 

Web Title: Finance Secretary Mayaram's replacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.