F-35B : मागील एका महिन्यापासून केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर अडकून पडलेले ब्रिटशी 'रॉयल नेव्ही' चे लढाऊ विमान F-35B अखेर दुरुस्त झाले. आज, मंगळवारी सकाळी या विमानाने ब्रिटनच्या दिशेने उड्डाण केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाने गेल्या महिन्यात तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले होते. तेव्हापासून या विमानाला दुरुस्त करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एकमिळालेल्या माहितीनुसार, F-35B लाइटनिंग लढाऊ विमानाने सकाळी 10:50 वाजता उड्डाण केले. तर, सोमवारीच या विमानाला हँगरमधून बाहेर काढून विमानतळाच्या बे मध्ये ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, ब्रिटिश रॉयल नेव्हीचे F-35B लाइटनिंग लढाऊ विमान हे ब्रिटनच्या सर्वात प्रगत स्टील्थ फ्लीटचा भाग आहे. जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असून, याची किंमत ११० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
१४ जून रोजी आपत्कालीन लँडिंग तांत्रिक बिघाडामुळे १४ जूनपासून हे विमान तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. ब्रिटनमधील विमान अभियंत्यांची एक टीम ते दुरुस्त करण्यासाठी येथे आली होती. याची दुरुस्ती सुमारे एक महिना चालली. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, या विमानाचे भाग सुटे करुन परत नेले जातील. मात्र, आता विमान दुरुस्त झाल्यामुळे आहे तसे परत नेण्यात आले.