शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

अखेर शरद यादवांवर कारवाई ! राज्यसभेतील नेतेपदावरुन हटवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 4:11 PM

शरद यादव यांनी जी भूमिका घेतली होती त्यामुळे अशा प्रकारची कारवाई आवश्यक होती.

पाटणा, दि. 12 - संयुक्त जनता दलाने शरद यादव यांना राज्यसभेतील नेतेपदावरुन हटवलं आहे. वारंवार पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना राज्यसभेतील नेतेपदावरुन हटवण्यात आले असे जदयूच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. शरद यादव यांनी जी भूमिका घेतली होती त्यामुळे अशा प्रकारची कारवाई आवश्यक होती असे बिहार जदयूचे अध्यक्ष वशिष्ठ नारायण यांनी सांगितले. 

बिहारचे खासदार आरसीपी सिंह शरद यादव यांची जागा घेतील. पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेचे नवनियुक्त सभापती एम.व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन आरसीपी सिंह यांची राज्यसभा नेतेपदी नियुक्ती झाल्याचे पत्र सोपवले. बिहारमध्ये महागठबंधनमधून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा नितीश कुमारांचा निर्णय शरद यादव यांना पटला नव्हता. ही आघाडी झाल्यापासून ते विरोध करत होते. गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या विजयानंतर शरद यादव यांनी टि्वटकरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. वास्तविक जदयूने या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती. 

1984 सालच्या उत्तरप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी असलेले आरसीपी सिंह यांनी 2010 साली सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली आणि जदयूमध्ये सहभागी झाले. नितीश कुमारांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. 2015 बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी महागठबंधनची कल्पना त्यांनीच मांडली होती असे सूत्रांनी सांगितले.  आता कोणालाच घाबरत नाही - शरद यादवजेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे. 

जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी सांगितलं की, 'काही नेता मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?. नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.