्र्र्रजळगाव -ईगतपूरी थर्ड रेल्वे लाईनचा अंतिम सर्वे सुरु

By Admin | Updated: December 16, 2015 18:54 IST2015-12-16T18:54:03+5:302015-12-16T18:54:03+5:30

सहा महिन्यात होणार काम : भुसावळ चौथी लाईनचा समावेश

In the final survey of the entire third railway line in Jagraon - EGG | ्र्र्रजळगाव -ईगतपूरी थर्ड रेल्वे लाईनचा अंतिम सर्वे सुरु

्र्र्रजळगाव -ईगतपूरी थर्ड रेल्वे लाईनचा अंतिम सर्वे सुरु

ा महिन्यात होणार काम : भुसावळ चौथी लाईनचा समावेश
जळगाव : भुसावळ -ईगतपुरी रेल्वे मार्गाच्या भुसावळ-जळगाव चौथी व जळगाव ते ईगतपुरी तीसर्‍या रेल्वेलाईनच्या ३०८ कि.मी.चे सर्वेक्षणास १६ रोजी सुरुवात करण्यात आली.
भुसावळ ते मुंबई रेल्वे मार्गावर वाढती वाहतूक पाहता रेल्वे मार्गाचा विस्तार होण्याची अवश्यकता आहे. त्या दृष्टीने भुसावळ-जळगाव या २४ कि.मी.मार्गाच्या फोर्थ रेल्वे लाईन तर जळगाव-ईगतपुरी दरम्यानच्या २८४ कि.मी. थर्ड रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाच्या कामास १६ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे काम पुणे येथील हायड्रोनिम सिस्टम कन्संलटन्सी या कंपनीला देण्यात आले आहे. येत्या सहा महिण्यात या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. शक्य झाल्यास आगामी रेल्वे बजेटमध्ये या मार्गाची घोषणा होण्याची शक्यता आहे.यासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाहतूक वाढणार
उधना- जळगाव रेल्व लाईच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचे काम पूर्ण होताच जळगाव- भुसावळ दरम्यानच्या लाईनवर वाढणारा अतिरिक्त वाहतूक लक्षात घेता. तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
चाळीसगाव -औरंगाबादचा सर्वे
चाळीसगाव -औरंगाबाद या ९५ कि.मी.च्या नवीन रेल्वे लाईनच्या सवेर्ेक्षणाचे काम रुडकी च्या इलाईट कन्संलन्सी या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून यासाठी ५-६लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तीन महिन्यात ते पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोट
जळगाव-ईगतपुरी मार्गाच्या तिसर्‍या व जळगाव -भुसावळ लाईनच्या चौथ्या मार्गाचे अंतिम सर्वेक्षणाला जळगाव व भुसावळ येथून आज सुरुवात करण्यात आली आहे.
-रोहित थावरे
एक्झीकेटीव्ह अभियंता (कंस्ट्रक्शन), भुसावळ.

Web Title: In the final survey of the entire third railway line in Jagraon - EGG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.