बटाटा लागवड अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

पेठ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने अजून ३० ते ४० टक्के बटाटा लागवड होणे बाकी आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.

The final stage of planting potato | बटाटा लागवड अंतिम टप्प्यात

बटाटा लागवड अंतिम टप्प्यात

ठ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने अजून ३० ते ४० टक्के बटाटा लागवड होणे बाकी आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.
आंबेगाव तालुक्यात गेल्या वीस दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने पेठ, पारगान, कारेगाव, कुरवंडी, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव भागातील शेतकर्‍यांनी बटाटा पिकाची लागवड केली आहे. एकूण दहा हजार एक क्षेत्रात दरवर्षी बटाटा पिकाची लागवड केली जाते. दहा पोत्यांपासून ५०० पोती बटाटा बियाणे लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत.
या भागातील प्रत्येक कुटुंब कुवतीप्रमाणे आपल्या क्षेत्रात बटाटा लागवड करतात. त्यामुळे या भागात बटाटा लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या साह्याने बटाटा लागवड सुरू केली आहे. ८०० रुपये तास याप्रमाणे बटाटा लागवडीचा बाजारभाव आहे. आगाऊ बुकिंग केल्यानंतर ट्रॅक्टर बटाटा लागवडीसाठी उपलब्ध होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ५० ते ६० टक्के क्षेत्रात बटाटा पिकाची लागवड झाली आहे. परंतु गेल्या दहा ते १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडत असल्याने तसेच जमिनीतील ओलावा सुकू लागल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
१५:३३, प्रामाणिक बटाटा बियाण्याच्या जातीची प्रामुख्याने शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. बियाणे, खते, लागवड, मजुरी असा एकूण एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च झाला आहे. पेप्सी कंपनीने या भागातील शेतकर्‍यांबरोबर करार केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी आवश्यक असणारे वातावरण तयार झाले आहे.
'सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आदी वित्तीय संस्थांनी सातगाव पठार भागातील शेतकर्‍यांना मागणीनुसार कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे,' असे भावडी येथील प्रगतिशील शेतकरी रमेश काळे यांनी सांगितले.
छायाचित्र : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात मजुरांच्या टंचाईमुळे शेतकर्‍यांनी बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.
(छायाचित्र : जयदीप हिरवे)

Web Title: The final stage of planting potato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.