2-जी खटल्याची अंतिम सुनावणी 19 डिसेंबरपासून
By Admin | Updated: November 10, 2014 23:28 IST2014-11-10T23:28:30+5:302014-11-10T23:28:30+5:30
टेलिकॉम कंपन्यांना 2-जी स्पेक्ट्रमचे वाटप करताना झालेल्या कथित घोटाळ्य़ाशी संबंधित खटल्याची अंतिम सुनावणी सोमवार दि. 19 डिसेंबरपासून सुरु करण्याचे विशेष न्यायाधीशांनी सोमवारी जाहीर केले.

2-जी खटल्याची अंतिम सुनावणी 19 डिसेंबरपासून
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्यांना 2-जी स्पेक्ट्रमचे वाटप करताना झालेल्या कथित घोटाळ्य़ाशी संबंधित खटल्याची अंतिम सुनावणी सोमवार दि. 19 डिसेंबरपासून सुरु करण्याचे विशेष न्यायाधीशांनी सोमवारी जाहीर केले.
या खटल्याच्या सुनावणीसाठी नेमलेल्या विषेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी याआधी अंतिम सुनावणी 1क् नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे ठरविले होते. मात्र विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर आनंद ग्रोव्हर यांनी आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केल्याने आता अंतिम सुनावणी 19 डिसेंबरपासून करण्याचे ठरले.
सर्वोच्च न्यायालयाने 2 फेब्रुवारी 2क्12 रोजी टेलिकॉम कंपन्यांना दिले गेलेले 122 2-जीचे परवाने रद्द केले होते. या व्यवहारांत सरकारी महसुलाचे 3क्,984 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा सीबीआयचा दावा
आहे.
4आरोपी माजी मंत्री ए. राजा, खासदार कनिमोही, माजी टेलिकॉम सचिव सिद्धार्थ बेहुरा, मंत्र्यांचे तत्कालीन स्वीय सचिव आर. के. चंडोलिया, स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद बलवा व विनोद गोएंका, युनिटेक लि.चे व्यवस्थापकीय ंसचालक संजय चंद्र, रिलायन्स एडएडीचे तीन वरिष्ठ अधिकारी- गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा व हरि नायर आदींचा समावेश आहे.