फायनल-कोळसा सचिव

By Admin | Updated: September 4, 2015 23:50 IST2015-09-04T23:50:59+5:302015-09-04T23:50:59+5:30

Final-Coal Secretary | फायनल-कोळसा सचिव

फायनल-कोळसा सचिव

>
माजी कोळसा सचिव गुप्तांसह पाच जणांना जामीन

नवी दिल्ली : कोळसा खाणप˜े वाटपाशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि एका वरिष्ठ अधिकार्‍यासह पाच जणांना जामीन मंजूर केला.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी गुप्ता यांच्याशिवाय के.एस. क्रोफा, विश्वास सावखंडे आणि ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालकद्वय मुकेश गुप्ता आणि सीमा गुप्ता यांना एक लाख रुपये जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. क्रोफा हे कोळसा मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव तर सावखंडे महाराष्ट्र सरकारच्या भूगर्भ आणि खाण संचालनालयाचे संचालक होते.
चौकशीत आम्ही संपूर्ण सहकार्य केले असून पुरावे नष्ट करण्याची अथवा पळून जाण्याचीही शक्यता नसल्याने जामीन मंजूर केला जावा, अशी विनंती आरोपींच्यावतीने करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Final-Coal Secretary