रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30
श्रीगोंदा : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या श्रीगोंदा शाखेने वसंत रामभाऊ भोसले (रा.श्रीगोंदा) यांची सुमारे १ कोटीची ठेव, त्यावरील व्याजाची रक्कम परत न केल्याने रायसोनी पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
श रीगोंदा : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या श्रीगोंदा शाखेने वसंत रामभाऊ भोसले (रा.श्रीगोंदा) यांची सुमारे १ कोटीची ठेव, त्यावरील व्याजाची रक्कम परत न केल्याने रायसोनी पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायसोनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोदकुमार रायसोनी, संचालक दिलीप चोरडिया, सुरजमल जैन, दादा रामचंद पाटील, मोतीलाल जिरी, राजाराम कोळी, भगवान वाघ, भागवत माळी, डॉ.हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालबागी, यशवंत जिरी, रमजान शेख, मुख्याधिकारी सुकलाल माळी, प्रमोद माळी (रा.सर्वजण जळगाव).वसंतराव भोसले यांनी मुदत ठेव म्हणून १ कोटी ७ लाख २० हजार ४३९ ची रक्कम मुदत संपल्यानंतरही पतसंस्थेने दिली नाही. आपला विश्वासघात, फसवणूक केली. संचालक मंडळाच्या विरोधात भा.दं.वि.कलम ४०९, ४०६, ४२०, ३४ महा प्रो ऑफ इन्टरेस्ट नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल बेहरानी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)